▶ शिवपूर फाट्याजवळील घटना, जेसीबीच्या साहाय्याने काढले मृतदेह बाहेर
गंगापूर, (प्रतिनिधी): भरधाव आयशर व कंटेनर एकमेकांना धडकल्याने दोन्ही वाहनातील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी (दि.८) इसारवाडी बिडकीन जवळील शिवपूर फाट्याजवळ पाच वाजेच्या सुमारास झाला.
चेविदास राठोड (रा. सुपा परभणी), नागेश सरडे (जि. सोलापूर ) अशी ठार झालेल्या चालकांची नावे आहेत. यानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. आयशर बिडकीनकडून इसारवाडीकडे जाणारा कंटेनर (एमएच ० ४ एमआर ७०४२) तर इसारवाडीकडून बिडकीनकडे (एमएच२० ईएल ९४०६) ही दोन्ही वाहने शिवपूर पाठ्याजवळ येताच एकमेकांना धडकली. हा अपघात एवढा भीषण होता की, तीनही वाहने एकमेकांमध्ये घुसली. यात दोन्ही वाहनांचे चाक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला होता.
घटनेच्या विकाणी सामाजिक कार्यकर्ते बद्री दुबिले, राधेश्याम कोल्हे, लल्लन चव्हाण यांनी तातडीने धाव घेत जेसीबी व ट्रॅक्टरच्चा सहाय्याने मृतदेह बाहेर काढले. दोघांनाही गंगापूर येथील रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. फौजदार अजय रमेश राठोड, सुखदेव भामरे आले. मागच्या महिन्यात याच जागेवर एका टूकने बैलगाडीला धडक दिली होती. यात कामगाराचा मृत्यू झाला.











